Homeताज्या बातम्यापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दोनशे रुग्णांवर ईसीटीपद्धतीने...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दोनशे रुग्णांवर ईसीटीपद्धतीने उपचार..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मानसोपचार विभागामध्ये माहे जानेवारी २०२४ पासून ते जून २०२६ या कालावधीत इलेक्ट्रो कॉनव्हलसिव्ह थेरपीद्वारे (ईसीटी) दोनशे रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती उपअधिष्ठाता व प्राध्यापक व विभाग प्रमुख भूलशास्त्र डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी दिली आहे.

ईसीटी ही तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांवर प्रभावी ठरणारी उपचारपद्धती आहे. या आधुनिक मॉडिफाइड ईसीटीमध्ये रुग्णाला प्रथम अल्पकालिन भूल देण्यात येते. त्यामुळे उपचारादरम्यान कोणताही त्रास किंवा वेदना जाणवत नाहीत. या उपचारामुळे आत्महत्येची प्रवृत्ती, तीव्र नैराश्य, आक्रमक वर्तन यामध्ये त्वरित सुधारणा होण्यास मदत होते. स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, तीव्र नैराश्य (डिप्रेशन), सायकोसिस यांसारख्या गंभीर मानसिक आजारांच्या उपचारामध्ये ईसीटीचा प्रभावी वापर केला जातो. अत्याधुनिक आणि सुरक्षित पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या उपचारामुळे गंभीर मानसिक आजारांवरील उपचार अधिक परिणामकारक ठरत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

योग्य वैद्यकीय तपासणी, भूलतज्ज्ञांची उपस्थिती आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिली जाणारी उपचारपद्धती अत्यंत सुरक्षित आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी स्वतःहून निर्णय न घेता प्रथम मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.शासकीय दरामध्ये ईसीटीद्वारे उपचार होत असल्याने परिसरातील रुग्णांना या थेरपीचा लाभ होत असून रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात येथे उपचार घेवून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. भालेराव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

error: Content is protected !!