Homeताज्या बातम्यामहा रक्तदान शिबिरात महिला उपनगराध्यक्षा श्वेता नाळे यांचे रक्तदान; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार...

महा रक्तदान शिबिरात महिला उपनगराध्यक्षा श्वेता नाळे यांचे रक्तदान; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले आभार..!

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला उपनगराध्यक्षा श्वेता नाळे यांचे रक्तदान

प्रतिनिधी : सुरज देवकाते

बारामती (दि. १९) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सामाजिक उपक्रमात बारामती नगरपालिकेच्या महिला उपनगराध्यक्षा श्वेता नाळे यांनी रक्तदान करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला.

रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे प्रभावी माध्यम आहे. या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महा रक्तदान शिबिरात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान केले.

यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिबिराला भेट देत रक्तदात्यांचे कौतुक केले. महिला उपनगराध्यक्षा श्वेता नाळे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होऊन अधिकाधिक नागरिक पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या महा रक्तदान शिबिरातून सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात आला. रक्तदानासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार मानत, भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!