Homeताज्या बातम्याबारामती शहर पोलिसांची धडक कारवाई : खुनाचा प्रयत्न प्रकरणातील चार महिन्यांपासून फरार...

बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई : खुनाचा प्रयत्न प्रकरणातील चार महिन्यांपासून फरार आरोपीला कोंबिंग ऑपरेशनमध्ये अटक…!

संपादक : सुरज देवकाते

बारामती(दि:११) बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्हा मधील आरोपी श्याम विलास सकट यास बारामती शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे चार महिन्यांहून अधिक कालावधीपर्यंत फरार राहिलेल्या या आरोपीस अखेर कायद्याच्या कचाट्यात आणण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले आहे.

सदर गुन्हा दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी बारामती येथील इंदापूर चौक परिसरातील हॉटेल गोकुळ येथे घडला होता. फिर्यादी आशिष प्रदीप केकाण यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान जखमीस भाग्यजय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालानुसार फिर्यादीच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात येऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला होता. त्यानंतर बाल न्याय मंडळ, पुणे यांनी संबंधित बालकास निरीक्षणगृह, येरवडा येथे ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी श्याम विलास सकट हा गुन्हा दाखल झाल्यापासून दिनांक ०५ मार्च २०२६ ते १० जुलै २०२६ या कालावधीत सतत फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी वेळोवेळी विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली, नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी केली तसेच माननीय न्यायालयामार्फत त्याच्याविरुद्ध जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. तरीदेखील आरोपी जाणीवपूर्वक पोलिसांना चकवा देत लपून राहत होता.

दरम्यान, दिनांक १० जुलै २०२६ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून आमराई परिसरात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त झालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी श्याम विलास सकट हा आमराई परिसरातील एका घरामध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले व विधीवत अटक केली.

सदर कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस शिपाई संतोष जगताप, पोलीस शिपाई कविटके, पोलीस शिपाई दत्ता मदने, पोलीस शिपाई अक्षय सिताफ आणि पोलीस शिपाई अमोल देवकाते यांनी सक्रिय सहभाग घेतला.अटक आरोपीस पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपीचा दीर्घकाळ फरार राहण्याचा इतिहास तसेच तपासातील बाबी विचारात घेऊन माननीय न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मंजूर केली. त्यानुसार आरोपीची येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर आरोपी हा गावठी हातभट्टी दारू विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सराईतपणे सहभागी असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची अधिक पडताळणी व तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

—————————–

बारामती शहर पोलिसांकडून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, गुन्हा करून फरार राहणे म्हणजे कायद्यापासून सुटका नव्हे. गुन्हेगार कितीही काळ लपून बसला तरी त्याचा शोध घेऊन त्याला न्यायालयासमोर उभे करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती बारामती शहर पोलिसांकडे आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन नागरिकांच्या सुरक्षेसाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.

पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन,

                 पुणे ग्रामीण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

error: Content is protected !!