सर्वानुमते निवडीनंतर संस्थेचे चेअरमन, सचिव व संचालकांचे व्यक्त केले मनःपूर्वक आभार
संपादक : सुरज देवकाते
बारामती (दि:७) :बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी आयु. श्री. भाऊसाहेब रामचंद्र झेंडे यांची आज, मंगळवार (दि. ७ जुलै २०२६) रोजी विद्यमान संचालकांच्या एकमताने व खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यक्षम व समन्वयाने काम करणाऱ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सर्व विद्यमान संचालकांनी श्री. झेंडे यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला. निवडीनंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर श्री. भाऊसाहेब रामचंद्र झेंडे यांनी संस्थेचे चेअरमन दादासाहेब जोगदंड, सर्व संचालक तसेच पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन दादासाहेब जोगदंड यांच्यासह संचालक भाऊसाहेब प्रभुणे, भालचंद्र ढमे, फिरोज अतार, हर्षल इंगोले, अजय लालबिगे, प्रतिभा सोनावणे, उमेश थोरात आणि उमेश लालबिगे उपस्थित होते. श्री. झेंडे यांच्या निवडीबद्दल सहकारी, कर्मचारी, सभासद तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















