Homeताज्या बातम्याविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; गणेश सोनवणे...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; गणेश सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण..!

देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

संपादक : सुरज देवकाते 

बारामती : भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश भाईजी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना अध्यक्ष गणेश सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत सदैव तेवत राहण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, समाजसुधारकांचे कार्य आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजय नामदेव सोनवणे, संस्थेचे सेक्रेटरी धनपाल विश्वनाथ भोसले, उपाध्यक्ष सौ. प्रतिभा संजय मोरे, संचालक सुशील कुमार दिलीप सोनवणे, संस्थेचे मावळते अध्यक्ष अशोक शिवराम सोनवणे, आयु. संजय भिकाजी मोरे, ज्येष्ठ संचालक दयानंद एकनाथ मिसाळ, विजय जयसिंग सोनवणे, दिलीप नाना सोनवणे, नितीन सोनवणे, खेडेकर सर, वसतिगृह अधीक्षक शंकर गेना चव्हाण यांच्यासह संस्थेचे सदस्य, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त वसतिगृह परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. महापुरुषांचे विचार, स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा संदेश देत हा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!