Homeताज्या बातम्यावेळीच धावून आले बारामती तालुका पोलीस; हृदयविकाराचा झटका आलेल्या ज्येष्ठ विधिज्ञाला बारामती...

वेळीच धावून आले बारामती तालुका पोलीस; हृदयविकाराचा झटका आलेल्या ज्येष्ठ विधिज्ञाला बारामती तालुका पोलिसांनी दिले जीवदान; तत्परतेबद्दल पोलिसांचा सत्कार

डी.बी. पथकातील मनोज पवार व जितेंद्र शिंदे यांची तत्परता; हृदयविकाराचा झटका आलेल्या अॅड. पाटणे यांचे प्राण वाचले, कृतज्ञतापूर्वक केला पोलिसांचा सत्कार.

प्रतिनिधी : सुरज देवकाते

बारामती : पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे यंत्र नाहीत, तर प्रसंगी माणुसकीचे दर्शन घडवत नागरिकांचे प्राण वाचविणारे देवदूतही ठरतात, याची प्रचिती बारामती तालुका पोलीस ठाण्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेत आली. वाई येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पाटणे यांना अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील पोलीस अंमलदारांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाई येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पाटणे हे काही शासकीय कामानिमित्त बारामती तालुका पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी अचानक त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते पोलीस ठाण्याच्या परिसरातच बेशुद्ध पडले. हा प्रकार घडताच परिसरात एकच धावपळ उडाली.

याच वेळी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार मनोज पवार आणि जितेंद्र शिंदे यांनी कोणतीही घाबरगुंडी न उडवता अत्यंत प्रसंगावधान राखले. त्यांनी तात्काळ अॅड. पाटणे यांना प्राथमिक उपचार देण्यास सुरुवात केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांना तातडीने बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी वेळेत उपचार सुरू केल्यामुळे अॅड. पाटणे यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांचे प्राण वाचले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळेच आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना अॅड. पाटणे यांनी व्यक्त केली.

या मोलाच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अॅड. पाटणे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यास भेट देत पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार मनोज पवार आणि जितेंद्र शिंदे यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि माणुसकीचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले.  या घटनेमुळे बारामती तालुका पोलिसांची कार्यक्षमता, संवेदनशीलता आणि नागरिकांप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संकटाच्या क्षणी धावून जाऊन एका व्यक्तीचे प्राण वाचविणाऱ्या या पोलिसांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे पोलीस दलाविषयी नागरिकांच्या मनातील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!