Homeताज्या बातम्याहातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका, बारामतीत अवैध धंद्यांवर करारी कारवाई!

हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका, बारामतीत अवैध धंद्यांवर करारी कारवाई!

बारामती शहर पोलिसांची कारवाही

संपादक- सुरज देवकाते 

बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी व्यापक, नियोजनबद्ध व प्रभावी मोहीम राबवून सलग धडक कारवाया केल्या आहेत. या कठोर कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहितीच्या आधारे गुणवडी, बांदलवाडी, आमराई व परिसरात एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ड्रम, भांडी व इतर साहित्य जप्त मोठ्या प्रमाणावर तयार दारू हस्तगत जप्त साहित्य व दारू जागीच नष्ट त्यामुळे अवैध व्यवसायावर तात्काळ व प्रभावी आळा बसला आहे. पायी पेट्रोलिंगद्वारे व्यापक मोहीम गेल्या चार दिवसांत पोलिसांनी खालील भागात पायी पेट्रोलिंग करून मोठी कारवाई केली.गुणवडी, बांदलवाडी, आमराई, पिंपळी, लिमटेक, कसबा, साठेनगर या कारवाईत घरगुती भट्ट्यांचा नायनाट, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने नष्ट करण्यात येऊन अवैध साठ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. पोलीसांनी केवळ कारवाईच नव्हे तर सामाजिक बांधिलकीही जपली आहे. गावोगावी जनजागृती मोहीम महिला वर्गाशी थेट संवाद दारूबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अवैध दारूमुळे होणारे आरोग्य व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले.परंपरागत दारू व्यवसाय करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना पर्यायी उपजीविकेकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

“अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहील. कोणताही बेकायदेशीर व्यवसाय आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे.” स्थानिकांकडून समाधान व्यक्त या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध धंद्यांना आळा बसेल. कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल.अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पीएसआय भंडारे, पो.हवा. यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, एएसआय संदीप जाधव, महिला पो.शि. सीमा निंबाळकर, राजश्री जगताप, पो.शि. अमोल देवकाते, अक्षय सिताफ, विशाल शिंदे, विजय ओमासे इत्यादी असून कारवाई करण्यात आली आहे.

*चौकट :“अवैध दारू म्हणजे आरोग्य व समाजासाठी गंभीर धोका!” आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

प्रभारी पोलीस निरीक्षक

बारामती शहर पोलीस स्टेशन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!