Homeताज्या बातम्याएकाच दिवशी चार न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपी जेरबंद..!

एकाच दिवशी चार न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपी जेरबंद..!

बारामती शहर पोलिसांची पहाटेपासून विशेष मोहीम; न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करत वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे व तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी

संपादक : सुरज देवकाते 

बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण मा.न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावूनही न्यायालयीन कार्यवाहीस हजर न राहिल्याने ज्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, अशा चार वेगवेगळ्या न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपींना एकाच दिवशी शोधून अटक करण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले आहे. वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पहाटे ५.०० वाजल्यापासून विशेष मोहीम राबवून तपास पथकाच्या मदतीने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार,  भोल्या ऊर्फ किशोर बापू भिसे, (रा. जगताप मळा, खंडोबानगर, बारामती, जि. पुणेमा.) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, बारामती येथील Sessions Case No. 102/2025, State BMT City P.S. Vs. Jayesh Babasaheb Mane, Baramati City या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 61(2), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 अन्वये प्रकरण असून मा. न्यायालयाने दि. 14/08/2026 रोजी अटक वॉरंट जारी केले होते.

सनी दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड. अनिकेत दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड या दोघांविरुद्ध मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, बारामती येथील RCC No. 415/2015 मध्ये Arms Act अंतर्गत प्रकरण प्रलंबित असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. उपलब्ध वॉरंटवर दि. 03/07/2026 ही तारीख नमूद असून पुढील हजेरीची तारीख 19/08/2026 असल्याचे दिसून येते.

 गणेश मारुती दळवी ,(रा. डोरलेवाडी बारामती, जि. पुणे) मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, बारामती येथील RCC No. 277/24 मधील प्रकरणात आरोपीविरुद्ध पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. उपलब्ध वॉरंटवर दि. 10/02/2026 ही तारीख नमूद आहे.

 मोहसीन इकबाल बागवान, (रा. कचेरी रोड, पुणेकर टेलर्स मागे, गांधी चौक, बारामती, जि. पुणे )मा. २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, बारामती यांच्या न्यायालयातील संक्षिप्त फौजदारी खटला क्र. 1218/2020, वैष्णवी नगरी पतसंस्था तर्फे दर्शन विवेक शहा विरुद्ध मोहसीन इकबाल बागवान या प्रकरणात परक्राम्य लेख अधिनियम कलम 138 अन्वये प्रकरण असून मा. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. सदर वॉरंट दि. 20/07/2026 रोजी जारी झाले असून त्यावर पुढील तारीख 18/08/2026 नमूद आहे.

पहाटे ५ वाजल्यापासून एकाच वेळी शोधमोहीम

न्यायालयीन वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांनी संबंधित आरोपींच्या वास्तव्याची व हालचालींची गोपनीय माहिती संकलित केली. आरोपी न्यायालयीन प्रक्रियेस हजर राहत नसल्याने त्यांच्या ठावठिकाण्याची खात्री करून बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे तांत्रिक व स्थानिक पातळीवर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे ५.०० वाजल्यापासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने शोध घेऊन चार न्यायालयीन वॉरंटमधील पाचही आरोपींना एकाच दिवशी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या अटक वॉरंटची कायदेशीर अंमलबजावणी करण्यात आली.

पाचही आरोपी न्यायालयासमोर हजर

अटक वॉरंटची अंमलबजावणी केल्यानंतर पाचही आरोपींना संबंधित मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मा. न्यायालयाने पुढील न्यायालयीन आदेशानुसार त्यांची जेल कस्टडीमध्ये रवानगी केली आहे. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे ही बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वॉरंट अंमलबजावणीतील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. विशेषतः आरोपींचा शोध, गोपनीय माहितीचे संकलन, पहाटेपासून केलेले नियोजन आणि न्यायालयीन आदेशाची वेळेत अंमलबजावणी यामध्ये पोलीस हवालदार उदय टापरे यांनी दाखविलेली चिकाटी, कर्तव्यनिष्ठा व कौशल्य प्रशंसनीय ठरले आहे.

वरिष्ठांकडून कामगिरीची दखल

सदर विशेष मोहिमेमध्ये वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांना तपास पथकातील पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ व पोलीस शिपाई तुषार शिंदे यांनी सक्रिय सहकार्य केले.

————————–

सदर उल्लेखनीय कामगिरीची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आली असून अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी पोलीस हवालदार उदय टापरे व पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल रिवॉर्ड रिपोर्ट प्रस्तावित/घोषित करण्यात आला असून चांगल्या कामगिरीच्या नोंदीमध्येही सदर कामगिरीची ठळक नोंद घेण्यात आली आहे.

“न्यायालयीन वॉरंट केवळ कागदावरील आदेश न राहता त्याची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी होणे ही न्यायप्रक्रियेची महत्त्वाची कडी आहे. न्यायालयीन प्रक्रियेस टाळाटाळ करणाऱ्या व वॉरंट प्रलंबित असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.”

(बारामती प्रभारी पोलिस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!