Homeताज्या बातम्यादिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने यंदा भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव साध्या...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने यंदा भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव साध्या पद्धतीने : मिरवणूक रद्द : पूजा व भजनाचा कार्यक्रम होणार..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती : भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येणार आहे. मात्र, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे यंदाचा जन्मोत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय भगवान वीर गोगादेव निषाण आखाडा (मंदिर), बारामतीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जन्मोत्सवानिमित्त कोणताही जल्लोष अथवा मोठी मिरवणूक काढण्यात येणार नसून केवळ विधीवत पूजा व भजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. येणार असल्याची माहिती भगवान वीर गोगादेव निषाण आखाड्याचे अध्यक्ष ॲड. धीरज लालबिगे यांनी दिली.

दरवर्षी भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवानिमित्त गोरक्षनाथ व गोगादेव मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून जन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र, स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्व. अजितदादा पवार यांनी गोगादेव मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देत मंदिराच्या सुशोभीकरणासाठीही सहकार्य केले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर यंदा उत्सवातील जल्लोष टाळून साध्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत भगवान वीर गोगादेव निषाण आखाडा (मंदिर) येथील सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते यंदा जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे यंदाच्या जन्मोत्सवातील पारंपरिक मिरवणूक व जल्लोषाला विराम मिळणार आहे.भाविकांनीही या निर्णयाची नोंद घेऊन जन्मोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे, तसेच शेवट च्या दिवशी म्हणजे ७  सप्टेंबर २०२६ रोजी भंडारा म्हणजे जेवण (महाप्रसाद) असणार आहे. दरम्यान सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवान वीर गोगादेव निषाण आखाड्याचे अध्यक्ष ॲड. धीरज लालबिगे  केले आहे.

————————————–

धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकीची परंपरा. 

“भगवान वीर गोगादेव निशाण आखाड्याच्या वतीने दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांसोबत विविध सामाजिक  उपक्रमही राबविले जातात. कोरोना  महामारीच्या काळात मिरवणूक रद्द करून त्यावरील खर्चातून तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मदतीसाठी निधी देण्यात आला होता. तसेच कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराच्या काळात मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला होता.याशिवाय बारामती नगरपरिषद शाळेला संगणक संच देणे, वृक्षारोपण करणे यांसह विविध सामाजिक उपक्रम आखाड्याच्या वतीने सातत्यानेराबविण्यात आले आहेत. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येणार आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!