Homeताज्या बातम्याUPSC परीक्षेत बारामतीच्या अथर्व पवार यांची Central Dysp पदावर निवड..!

UPSC परीक्षेत बारामतीच्या अथर्व पवार यांची Central Dysp पदावर निवड..!

सायली हिलच्या सुपुत्राचा देशपातळीवरील गौरव; नगरसेविका अनुप्रिता डांगे व अक्षय डांगे परिवाराकडून अभिनंदन.

संपादक : सुरज देवकाते

बारामती : बारामती तालुक्यातील सायली हिल परिसरातील सुपुत्र अथर्व सुनीता प्रदीप पवार यांनी केंद्रीय लोकसेवाआयोगाच्या (UPSC) CAPF (Assistant Commandant) 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय ३२ वा क्रमांक    (AIR-32) मिळविला आहे. या यशाच्या बळावर त्यांची Central DySP पदावर निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे बारामती तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

स्पर्धा परीक्षेतील कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि देशसेवेची प्रबळ जिद्द यांच्या जोरावर अथर्व पवार यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत जबाबदारीची भूमिका पार पाडण्याची संधी मिळाल्याने अथर्व पवार यांचे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवले तर कोणतेही यश अशक्य नाही, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

दरम्यान, बारामती नगरपरिषदेच्या नगरसेविका  अनुप्रिता डांगे व अक्षय डांगे परिवाराच्या वतीने अथर्व पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल गौरव व्यक्त करत देशसेवेच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अथर्व पवार यांनी आपल्या कार्यातून देशाची आणि बारामतीची कीर्ती अधिक उंचावावी तसेच आगामी सेवाकाळ यशस्वी व प्रेरणादायी ठरावा, अशा सदिच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!