Homeताज्या बातम्याबारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे 'जोडे...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध..

संपादक : सुरज देवकाते

बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि:३) रोजी भिगवन चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, महिला पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, राजकीय मतभेद असले तरी महिला नेतृत्वाबाबत अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला आणि लोकशाही मूल्यांना न शोभणारी बाब असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका ही बिनबुडाची, तथ्यहीन आणि राजकीय वैफल्यातून करण्यात आल्याचा आरोप केला. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या महिला नेतृत्वावर वैयक्तिक स्वरूपाची टीका करून राजकारणाची पातळी घसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच काँग्रेस पक्षाने देशाला अनेक सक्षम महिला नेते दिले आहेत. अशा पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरली जाणे दुर्दैवी असून, यामुळे काँग्रेसचीच प्रतिमा मलिन होत असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांच्या कामाचे मूल्यमापन त्यांच्या कार्याच्या आधारे व्हावे, वैयक्तिक टीका करून राजकीय संस्कृतीचा अवमान करू नये, असेही यावेळी सांगण्यात आले.

आंदोलनादरम्यान निषेधाचे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. भविष्यात महिला नेतृत्वाचा अवमान करणारी कोणतीही वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष,नगराध्यक्ष, युवकअध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भिगवन चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भिगवन चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, युवक अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, महिला पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!