५७ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त अभिवादन सोहळा
प्रतिनिधी : सुरज देवकाते
बारामती, दि. १८ : विश्वविख्यात साहित्यिक, साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त बारामतीतील साठेनगर येथे अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास बारामती नगराध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण इंगळे तसेच बारामती वकील संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. सचिन वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, गणेश जोजारे, अमोल कावळे, नगरसेविका शर्मिलाताई ढवाण पाटील, मनिषा बनकर, अॅड. पी. टी. गांधी, पत्रकार तानाजी पाथरकर, सामाजिक कार्यकर्ते ओंकार देशमुख, संदीप बनकर, टी. व्ही. मोरे, दिलीप ढवाण पाटील, शुभम अहिवळे, प्रतीक ढवाण पाटील, योगेश महाडीक, गजानन गायकवाड, राजेश कांबळे, महावीर गायकवाड, विशाल खंडाळे, संजय वाघमारे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात, नगरसेविका प्रतिभा खरात, अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, लहुजी प्रतिष्ठान पॉइंट, लहुजी शक्ती सेना, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, जय लहुजी फ्रेंड सर्कल आणि क्रांतीसेना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















