Homeताज्या बातम्याबारामती नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० च्या अंमलबजावणीत पुणे विभागात अव्वल..!

बारामती नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० च्या अंमलबजावणीत पुणे विभागात अव्वल..!

३९५ घरकुलांना मंजुरी; ३८८ लाख रुपयांचे अनुदान वितरित, २८ घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे दाखल.

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि १३) : ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०ची बारामती नगरपरिषद हद्दीत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत ३९५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. पुणे विभागातील नगरपरिषदांच्या तुलनेत बारामती नगरपरिषदेच्या सर्वाधिक घरकुलांना मंजुरी मिळाली असून, यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०च्या अंमलबजावणीत बारामती नगरपरिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे.

गृहनिर्माण विभागाच्या शासन निर्णय क्र. प्रआयो.२०२४/प्र.क्र.८७/गृनीधो-२, दि. १५ ऑक्टोबर २०२४नुसार या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. बारामती नगरपरिषदेकडून योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी आवश्यक त्या टप्प्यांनुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी रु. २.५० लाखांचे अनुदान अनुज्ञेय असून, त्यामध्ये केंद्र शासनाचा रु. १.५० लाख आणि राज्य शासनाचा रु. १.०० लाख हिस्सा आहे. प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेल्या मंजूर घरकुलांपैकी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण रु. ३८८ लाखांचे अनुदान ऑनलाइन स्नॅप पोर्टलद्वारे वितरित करण्यात आले आहे.

यामध्ये पहिल्या हप्त्यापोटी २०८ लाभार्थ्यांना, तर दुसऱ्या हप्त्यापोटी १८० लाभार्थ्यांना प्रत्येकी रु. १ लाख याप्रमाणे अनुदान देण्यात आले आहे. या प्रत्येक हप्त्यामध्ये केंद्र शासनाचा रु. ६० हजार आणि राज्य शासनाचा रु. ४० हजारांचा हिस्सा आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी २८ घरकुलांचा प्रस्ताव दि. २८ जुलै २०२६ रोजी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर बारामती नगरपरिषदेकडून रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत सन २०२५-२६ करिता २४ लाभार्थी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १२ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी प्रत्येकी रु. १ लाख याप्रमाणे रु. १२ लाख, तर ६ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी प्रत्येकी रु. १ लाख याप्रमाणे रु. ६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

बारामती शहरातील प्रत्येक गरजू नागरिकाला स्वतःचे पक्के घर मिळावे आणि बारामती शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, हे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी बारामती नगरपरिषदेकडून घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती नगरपरिषदेकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० तसेच रमाई आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा, घरकुलांचे बांधकाम सुरू व्हावे आणि योजनेच्या माध्यमातून नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. बारामती नगरपरिषदेच्या या कामगिरीमुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०च्या अंमलबजावणीत पुणे विभागात बारामती नगरपरिषद अवलस्थानी असल्याचे अधोरेखित झाले आहे.

बारामती शहरातील जास्तीत जास्त गरजू व पात्र नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० आणि रमाई आवास योजना (शहरी) यांचा लाभ घ्यावा. या योजनेच्या पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच इतर माहितीसाठी नागरिकांनी बारामती नगरपरिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

“बारामती शहरातील प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे पक्के घर मिळावे आणि शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, हे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामती नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून गतीने कार्यवाही केली जात आहे. पुणे विभागात बारामती नगरपरिषद अव्वल ठरली असून, ही कामगिरी नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्हाला प्रेरणा देणारी आहे.”

                – श्री. सचिन सातव

       ( नगराध्यक्ष,बारामती नगरपरिषद.)

———————————-

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड, प्रस्ताव सादरीकरण, मंजुरी आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. मंजूर घरकुलांचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू होऊन लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यापुढेही अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध राहील.”

                  – श्री. पंकज भुसे

(मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!